"बाली" - ज्याला जसे हवे तसे
[The way you want to look at it ]
बराच काळ म्हणजे साधारण २ वर्षे विचारात घालवल्यावर मी एकदाचे Vacation ला जायचे ठरवले. मग अगदी मुळशीपासून नायगरा पर्यंत सगळ्या पर्यायांवर चर्चेच्या फैरी झडल्या , आणि मग सगळी जुळवा जुळव करून बालीला जाण्याचा निर्णय पक्का झाला.
आता माझ्या आणि टुरिस्ट कंपन्यांच्या डेट्स काही जुळेनात , शेवटी आपणच आपली टूर आखायची असा निर्णय घेतला
आणि सुरूझाला बाली प्रवास
चला तर मग फेरफटका मारुयात बालीला
बाली ,इंडोनेशिया - बाली हे इंडोनिशिअन द्वीपसमूहातील एक बेट, सुंदर समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण निसर्ग , कला आणि संस्कृती जपणारी अनेक मंदिरे हि बालीची वैशिष्ट्ये , कमी कालावधीत बाली मध्ये फिरणं थोडं अवघडच , खूप गोष्टी बघण्यासारख्या आणि करण्यासारख्या आहेत. बालीमध्ये जाताना सगळ्यात महत्वाचा मुद्द्य येतो कि तुम्हाला तिकडे जाऊन काय करायला आवडेल. मला सगळं आवडेल असे जर तुमचे उत्तर असेल तर मग साधारण १५-२० दिवसांची ट्रिप तुम्हाला प्लॅन करायला लागेल. थोडे इंटरनेट वर सर्च केलेत तर कुठे उतरायचे हे ठरवता येईल, आमचा (अर्थात माझा आणि माझ्या सुविद्य पत्नी चा ) उद्देश आरामात जेवढे काही बघता येईल तेवढे बघणे आणि समुद्रकिनारी रिलॅक्स करणे असा होता. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमची ट्रिप ३ दीवस समुद्र किनारा आणि २ दिवस सांस्कृतिक बाली अशी विभागणी केली , पहिले ३ दिवस नासा दुआ ह्या समुद्रकिनाऱ्यावरील गावातील हॉटेल बुक केले आणि पुढचे २ दिवस उबूड ह्या गावी जायचे ठरवले, जुजबी तयारी करून आमचा प्रवास सुरु झाला
बाली ,इंडोनेशिया - बाली हे इंडोनिशिअन द्वीपसमूहातील एक बेट, सुंदर समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण निसर्ग , कला आणि संस्कृती जपणारी अनेक मंदिरे हि बालीची वैशिष्ट्ये , कमी कालावधीत बाली मध्ये फिरणं थोडं अवघडच , खूप गोष्टी बघण्यासारख्या आणि करण्यासारख्या आहेत. बालीमध्ये जाताना सगळ्यात महत्वाचा मुद्द्य येतो कि तुम्हाला तिकडे जाऊन काय करायला आवडेल. मला सगळं आवडेल असे जर तुमचे उत्तर असेल तर मग साधारण १५-२० दिवसांची ट्रिप तुम्हाला प्लॅन करायला लागेल. थोडे इंटरनेट वर सर्च केलेत तर कुठे उतरायचे हे ठरवता येईल, आमचा (अर्थात माझा आणि माझ्या सुविद्य पत्नी चा ) उद्देश आरामात जेवढे काही बघता येईल तेवढे बघणे आणि समुद्रकिनारी रिलॅक्स करणे असा होता. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमची ट्रिप ३ दीवस समुद्र किनारा आणि २ दिवस सांस्कृतिक बाली अशी विभागणी केली , पहिले ३ दिवस नासा दुआ ह्या समुद्रकिनाऱ्यावरील गावातील हॉटेल बुक केले आणि पुढचे २ दिवस उबूड ह्या गावी जायचे ठरवले, जुजबी तयारी करून आमचा प्रवास सुरु झाला
बाली विषयी काही महत्वाचे
बाली ची करन्सी - इंडोनेशियन रुपी - आपल्या इंडियन रुपया पेक्षा खूप कमी "किंमत" असलेली अशी हि करन्सी , आपला १ रुपया म्हणजे साधारण २०० इंडोनेशियन रुपये , आता हे वाचुन हुरळून जाऊ नका , तिथल्या किमतीही तशाच आहेत म्हणजे पाण्याची छोटी बाटली आहे ३००० Rp ला म्हणजे साधारण १५ इंडियन रुपयाला ,, तर बाली स्वस्त आहे असा एक जो समज आहे तो अजिबात खोटा आहे. आपला इंडियन रुपया तिकडे कन्व्हर्ट करून घेणे थोडे महागात पडते , त्यापेक्षा भारतातच रुपये डॉलर मध्ये बदलून घेणे आणि तिकडे एखाद्या लोकल एक्सचेंज मध्ये त्याचे इंडोनेशियन रुपी करून घेणे जरुरी आहे , तुम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरला असाल तर तिथे करन्सी बदलून मिळेल , पण तिथे करण्या पेक्षा जरा बाहेर पडून ४/५ दुकाने फिरा , प्रत्येक ठिकाणी रेट मध्ये थोडा फार फरक जाणवेल , जिथे जास्त रेट असेल तिथे जा आणि कमिशन काही घेतले जाणार नाही ह्याची खात्री करा , काही ठिकाणी रेट जास्त मिळतो पण कमिशन घेतात , एकूण काय मोबाइल मधला कॅल्क्युलेटर चा शॉर्टकट मेन स्क्रीन वर ठेवा आणि पटापट आपल्याला काय फाद्याचे ठरतेय ते पहा (हे सगळं कळायला मला शेवटचा दिवस उजाडला ,, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते ) , असो. जरी आपण म्हणतो कि conversion करू नये पण आपली सवय जाणार नाही , म्हणून एक सोपी पद्धत - जितके इंडोनेशियन रुपी आहेत त्याला २०० ने भागायचे ती आपली इंडियन रुपयातली किंमत
भाषा - बालीनीज - इथली भाषा इंडोनेशियन भाषेपेक्षा जरा वेगळी आहे , काही संस्कृत शब्द त्यात आढळतात , नमस्ते किंवा हॅलो ला बाली भाषेत "ओम स्वस्ति अस्तु" असे म्हणतात, बहुतांश लोकांना (जे आपल्याला सेवा देतात) इंग्रजी येत असते, त्यामुळे फार अडचण येत नाही (अर्थात आपल्याला पण इंग्रजी यायला हवे ) ,
गेल्या गेल्या - एअरपोर्ट वर पोचलात आणि इमिग्रेशन झाले कि लगेच काही टेलिफोन कंपन्यांचे बूथ दिसतील , तिथे एक इंटरनेट वाले प्री-पेड कार्ड घेणं उत्तम , ते तुमच्या फोन मध्ये ते कार्ड बसवुन देतात . म्हणजे पुढच्या बऱ्याच गोष्टी सुखकर होतात , सर्व हॉटेल मध्ये वाय फाय असले तरी रस्त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे, मग तुम्ही टॅक्सी बुक नसेल केलीत तरी हरकत नाही , कोणतीही टॅक्सी मिळेल , पण रेट ठरवताना जरा चौकशी करा ( साधारण २००,००० ते ६००,००० IDR , म्हणजे १००० ते ३००० रुपये )
राहणे - बाली मध्ये राहण्यासाठी अगदी ५ स्टार हॉटेल्स पासून नो स्टार होम स्टे पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या पसंती नुसार आपण हॉटेल निवडू शकतो, एका रात्रीचे भाडे ९०० रु (इंडियन रु ) पासून ३०,००० इंडियन रुपया पर्यंत आहे ( जसे गोव्यामध्ये आहे ) . परंतु ५००० ते ६००० प्रति रात्र उत्तम हॉटेल मिळते , हॉटेल बघताना ब्रेकफास्ट समाविष्ट असणे गरजेचे आहे , कारण बाहेर तितकी विविधता मिळणार नाही (आणि महाग हि पडते) , हॉटेल पाहताना जवळ काय काय आहे ह्याची तपासणी करा. चालण्याच्या अंतरावर काही इंडियन रेस्तरॉंट्स आहेत का ते पहा , एखादे सुपर मार्केट आहे का ते पहा. माझ्यामते हॉटेलची एअरपोर्ट शटल सेवा जर मोफत असेल तरच वापरा , अन्यथा ते महाग (बरेच महाग ) पडते. आणि एअरपोर्टवरून हॉटेल वर जाताना किंवा परत जाताना टॅक्सी मिळणे अवघड नाही , पण ती आधीच बुक करून ठेवावी ( इथून सुद्धा टॅक्सी बुक करता येते, इंटरनेटवर काही नंबर्स मिळतील , त्यांचे व्हॉट्सऍप चालू असते , त्यांच्याशी आधीच संपर्क करून ठरवून घेता येईल )
खाणे - खाण्याच्या बाबतीत बाली एकंदरीतच समृद्ध आहे , व्हेजिटेरियन लोकांसाठी विविधता कमी असली तरी उत्तम पदार्थ मिळतात, मांसाहारी आणि त्यातून मासे आवडत असलेल्या लोकांसाठी खूप पर्याय आहेत, परंतु माझ्या मते जर तुमचे राहण्याचे ठिकाण रेस्टोरंटस पासून जवळ असेल तर ठीक नाही तर ऑल इन्कलुसीव रूम बुक करणे उत्तम . काही इंडिअन रेस्टोरंटस मोफत नेण्या आणण्याची सोया पण करतात , तशी चौकशी करायला लाजू नका. पण बाहेर खाणे जरा महागच आहे म्हणजे २ माणसांसाठी अगदी फुटकळ खायला साधारण १५०० ते २००० रुपये लागतात ( छोले ९८००० IDR म्हणजे ४९० रुपये ,२ बटर रोटी ७०,००० - ३५० रु , जिरा राईस , दाल - ५०० रु , पाणी - ५० रु ) . बाकी तिथल्या नेटिव्ह डिश ट्राय करायला हव्यातच , इटालियन किंवा चायनीज खाणे पण उत्तम मिळते , अर्थात तुमची टेस्ट तशी असायला हवी नाहीतर मग आहेच बटर चिकन , पनीर बटर मसाला
फिरणे - फिरण्यासाठी खूप ऑपशन्स आहेत, जर इथून जाताना तुम्ही इंटरनॅशनल लायसेन्स काढून गेलात तर बाईक रेंट वर घेणे उत्तम पर्याय , नाही तर घाऊक मध्ये (२ / ४ दिवसांसाठी ) टॅक्सी बुक करणे उत्तम , इथे तुमच्या निगोशिएशन स्किल्स ची कसोटी आहे , मी हिशोब करताना ह्याच गोष्टी साठी मी भारतात किती पैसे दिले असते असा हिशोब केला आणि त्याला २०० नि गुणायचे ( म्हणजे समजा एअरपोर्ट ला जायला पुण्याहून मी २००० रु देतो तर तिकडे २००० * २०० = ४०,००० IDR देणे मला परवडणारे आहे ) आता ह्यात थोडे इकडे तिकडे ( तिकडेच जास्त ) होते , , बाहेर टॅक्सी टॅक्सी म्हणून ओरडणाऱ्या माणसाला पकडून बुक केले तरी हरकत नाही , त्यांचा व्हॉट्सऍप नंबर ते देतात , तुमच्या राहण्याचा हॉटेल मध्ये जर टूर बुक करण्याची सोय असेल तर ठीक आहे पण बाहेर जाऊन आधी दर बघा , कम्पेअर करा आणि मगच ठरवा , त्यात काय काय दाखवणार ते पहा, बऱ्याच ठिकाणी (अगदी सगळ्या देवळात सुद्धा ) प्रवेश फी असते ५०,००० IDR पासून १५०,००० IDR (२५० रुपये ते ७५० रुपये ) , बाकी भरपूर भटका , समुद्रावर स्कुबा डायविंग करा (त्याची CD बनवा ) , पॅरासिलींग करा , तिथले लोकल सांस्कृतिक कार्यक्रम बघा, मसाज करून घ्या ( तेही ६०,००० पासून २०००,००० पर्यंत किमती आहेत) आणि मजा घ्या.
No comments:
Post a Comment